विनाव्यत्यय कॅशलेस सुविधा प्रदान करण्यासाठी, रुग्णालयाने प्रमुख विमा कंपन्या आणि टीपीएंना पॅनलवर समाविष्ट केले आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • -रुग्णालयात उपलब्ध असणारे प्री-ऑथोरायझेशन किंवा कॅशलेस क्लेम फॉर्म
  • - रुग्णाचे विमा कार्ड किंवा विमा दस्तावेजाची प्रत
  • - रुग्णाचे आधार कार्ड/पॅन कार्ड

कॅशलेस सुविधेचा लाभ घेण्याची प्रक्रिया

पायरी-१

रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या विमा डेस्करवर उपलब्ध असणारे प्री-ऑथोरायझेशन किंवा कॅशलेस क्लेम फॉर्म मिळवावा.

पायरी-२

रुग्ण किंवा नातेवाईकांनी विमा कार्ड किंवा विम्याची कागदपत्रे, रुग्णाचे आधार कार्ड आणि सोबत रितसर भरलेला आणि स्वाक्षरी केलेला कॅशलेस फॉर्म सबमिट करावा.

पायरी-३

संलग्नित रुग्णालये कॅशलेस फॉर्म विमा कंपनी किंवा टीपीएकडे प्रारंभिक कॅशलेस मंजुरीसाठी सादर करेल.

पायरी-४

रुग्णाच्या डिस्चार्जच्या वेळी संलग्नित रुग्णालय अंतिम बिल आणि डिस्चार्जचा सारांश विमा कंपनी किंवा टीपीएकडे अंतिम कॅशलेस मंजुरीसाठी सादर करेल.

रुग्णालयाला संलग्नित/पॅनलवरील विमा कंपन्या आणि TPA ची यादी