चॅनल भागीदार

पॅथकाईंड लॅब्स-

पॅथकिंड लॅब्सद्वारे आम्ही रुग्णालयातील प्रयोगशाळा व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या सर्वसमावेशक सेवा पुरवितो. यामुळे रुग्णांचा चाचण्यांसाठी लागणाऱ्या वेळेची बचत होते शिवाय यामुळे रुग्णांची काळजी अजून परिणामकरित्या घेण्याची संधी मिळते.
तज्ञ आणि अनुभवी कर्मचारी आणि अत्याधुनिक सुविधांमुळे प्रयोगशाळा चाचण्यांची प्रक्रिया सुव्यवस्थित करणे, कार्यक्षमता वाढवणे आणि रुग्णालय आणि रुग्णांसाठी एकूणच आरोग्यसेवेचा उत्कृष्ट अनुभव प्रदान करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

कॅन्सर थेरपी सेंटर (IOSPL)

कॅन्सर थेरपी सेंटर्स हे इंटरनॅशनल ऑन्कोलॉजी सर्व्हिसेस प्रा. लि. चे एक युनिट असून सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांच्यासोबत धोरणात्मक भागीदारीद्वारे रुग्णालयात कॅन्सर थेरपी सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. येथे कर्करोगासंबंधी सर्वसमावेशक उपचार उपलब्ध आहेत.