योजना

Mjpjay logo

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

(पूर्वीची राजीव गांधी जीवनदायी योजना)

उद्देश

दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) आणि दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) कुटुंबांना (पांढरे रेशनकार्ड धारक वगळून) नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे. या सेवा अशा असाव्यात ज्यात रुग्णांना शस्त्रक्रिया, उपचार किंवा समुपदेशनासाठी नेटवर्कमधील रुग्णालयात दाखल करावे लागते.

फायदे

या योजनेत सुमारे ९७१ प्रकारचे शस्त्रक्रिया/उपचार/प्रक्रियांचा समावेश आहे.

कुटुंब

कुटुंब म्हणजे राज्यातील ३६ जिल्ह्यांतील वैध केशरी/पिवळ्या रेशनकार्डवर नाव असणारे कुटुंबातील सदस्य. आणि शेतीवर संकट असणाऱ्या १४ जिल्ह्यांतील ७/१२ धारक शेतकऱ्यांचे कुटुंब.

ओळख

वैध केशरी/पिवळे/पांढरे रेशनकार्डासोबत

  • पॅन कार्ड,
  • आधार कार्ड,
  • ड्रायव्हिंग लायसन्स,
  • मतदार ओळखपत्र,
  • फोटोसह राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक,
  • अपंग प्रमाणपत्र,
  • शाळा/कॉलेजचे ओळखपत्र.
  • ग्रामीण भागात फोटोवर तहसीलदार/ शिक्का व स्वाक्षरी
  • शहरी भागात तहसीलदार/शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या फोटोवर शिक्का व स्वाक्षरी
  • पासपोर्ट
  • केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेले ज्येष्ठ नागरिक कार्ड
  • स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र
  • सैनिक मंडळाद्वारे जारी केलेले संरक्षण माजी सेवा कार्ड
  • महाराष्ट्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने जारी केलेले मरीन फिशर्स ओळखपत्र
  • महाराष्ट्र किंवा केंद्र सरकारने जारी केलेला कोणताही फोटो आयडी पुरावा.
  • फोटो आयडी पुरावा हा आरोग्य विमा सुविधेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी ओळखण्याचे साधन म्हणून उपयोगी ठरते.

फ्लोटर आधारावर

फ्लोटर आधारावर आणि विम्याच्या कालावधीवर विम्याची रक्कम-

  • -योजनेअंतर्गत प्रति कुटुंबाला प्रतिवर्ष संलग्नित कोणत्याही रुग्णालयात उपचारासाठी १.५० लाख रुपयापर्यंतच्या खर्चाची पूर्तता होते. पॅकेजच्या दरांनुसार वैध रेशन कार्डाद्वारे कॅशलेस उपचार मिळतात.
  • -हा लाभ कुटुंबातील प्रत्येक सदस्याला फिरत्या पद्धतीने म्हणजेच फ्लोटर आधारावर मिळतो. म्हणजेच कुटुंबातील एक व्यक्ती एकाच वेळी किंवा सर्व सदस्य एकत्रितपणे घेऊ शकतात.
  • -मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या (रेनल ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रियेच्या बाबतीत, १ वर्षाच्या कालावधीसाठी इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी आवश्यक आहे.
  • -त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीतील पॅकेज म्हणून रेनल ट्रान्सप्लांटसाठी कमाल मर्यादा प्रति शस्त्रक्रिया रु. २.५० लाख ठेवण्यात आली आहे.

पॅकेज

या पॅकेजमध्ये लाभार्थी रुग्णालयात भरती झाल्यापासून त्याची सुटी झाल्यानंतर पुढील १० दिवसांच्या कालावधीतील उपचाराचा संपूर्ण खर्च समाविष्ट आहे. यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर काही त्रास झाल्यास रुग्णाला खऱ्याअर्थाने कॅशलेस सेवेचा लाभ मिळू शकेल.
पॅकेजच्या दरांमध्ये जनरल वॉर्डमधील बेडचे शुल्क, नर्सिंग आणि बोर्डिंग शुल्क, सर्जन, भूलतज्ञ, मेडिकल प्रॅक्टिशनर, समुपदेशक, ऍनेस्थेसिया, रक्त, ऑक्सिजन, ऑपरेशन थिएटर, सर्जिकल उपकरणांचे शुल्क, औषधी, प्रॉसथेटीक उपकरणे, प्रत्यारोपण, एक्सरे, चाचण्या, आंतररुग्णांना अन्न तसेच रुग्णालय ते रुग्णाच्या निवासस्थानापर्यंत राज्य परिवहन किंवा द्वितीय श्रेणीचे रेल्वे भाडे यांचा समावेश आहे.

आधीच अस्तित्वात असलेले आजार

योजनेत सर्व आजारांवर पहिल्या दिवसापासून उपचार केले जातील. ही पॉलिसी सुरू होण्यापूर्वी असणाऱ्या आजारांवरही योग्य ती मंजुरी प्रक्रिया पूर्ण करून उपचार केले जातात.

संलग्नित रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी पायऱ्या

लाभार्थी कुटुंबांनी जवळच्या सामान्य/महिला/जिल्हा रुग्णालय/ किंवा संलग्नित रुग्णालयाशी संपर्क साधावा. यासाठी वरील रुग्णालयांतील आरोग्यमित्रही लाभार्थीची मदत करतील.

संलग्नित रुग्णालयातील आरोग्यमित्र रुग्णांचे रेफरल कार्ड, हेल्थ कार्ड, पिवळे/केशरी रेशन कार्ड किंवा अन्नपूर्णा वा अंत्योदय कार्ड तपासून रुग्णांची नोंदणी करतात. आरोग्यमित्र संबंधित रुग्णांना पुढील उपचार, प्राथमिक निदान, चाचण्यांची दिशा ठरविण्यासाठी सल्ला देतात. रुग्णालयातील समन्वयक महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेसाठी आवश्यकतेनुसार कागदपत्रे तयार करतात. MJPJAY.

संलग्नित रुग्णालये प्राथमिक चाचण्यांनुसार रुग्णाला दाखल करून घेतात आणि विमा कंपनीला ई-प्राधिकरण विनंती पाठवतात. याप्रमाणेच महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेसाठीही याचे पुनरावलोकन केले जाऊ शकते.

विमा कंपनी आणि महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेचे मान्यताप्राप्त वैद्यकीय विशेषज्ञ पूर्व-प्राधिकरण विनंतीची तपासणी करतात. सर्व अटी-शर्ती पूर्ण असल्यास त्यास अंतरिम मंजुरी देतात. ही प्रक्रिया २४ तासांच्या आत करणे बंधनकारक आहे. तर आपत्कालीन परिस्थिती ज्यात ई-प्राधिकरण "EM" म्हणून चिन्हांकित असेल ती प्रकरणे तात्काळ मंजूर करावे लागतात.

संलग्नित रुग्णालये लाभार्थींना कॅशलेस उपचार आणि शस्त्रक्रिया प्रदान करते. शस्त्रक्रियेनंतरचे नोट्स नेटवर्क संलग्नित रुग्णालयातील समन्वयकाद्वारे वेबसाईटवर अद्ययावत केले जातात.

लाभार्थीवर शस्त्रक्रिया/थेरपी/उपचार झाल्यानंतर संलग्नित रुग्णालये मूळ बिले, उपचाराचा अहवाल, केस शीट आणि रुग्णाचे समाधान पत्र, डॉक्टरांनी स्वाक्षरी केलेल्या डिस्चार्ज रिपोर्टचा सारांश, वाहतूक खर्चाची पावती आणि इतर संबंधित कागदपत्रे विमा कंपनीला पाठवतात. दाव्याच्या निकालासाठी डिस्चार्ज रिपोर्टचा सारांश आणि फॉलोअप तपशील हा महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेच्या पोर्टलचा भाग आहे.

विमाकर्ता बिलांची छाननी करून त्यास मंजुरी देतो. निर्धारित कालावधीत संबंधित रुग्णालयाला पॅकेजप्रमाणे उपचाराची रक्कम अदा करतो. इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स आणि पेमेंट गेटवेसह क्लेम सेटलमेंट मॉड्यूल हे महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेतील प्रक्रियेचा एक भाग असून ही प्रक्रिया विमा कंपनीद्वारे पूर्ण केली जाते. संबंधित अहवाल योजनेच्या संकेतस्थळावर लॉगिन करून छाननीसाठी उपलब्ध करून दिला जातो.

रुग्णाला सुटी मिळाल्यानंतर पुढील १० दिवस संलग्नित रुग्णालय त्यास विनामूल्य तपासणी, पाठपुरावा, सल्ला, उपचार आणि औषधे प्रदान करण्यास बंधनकारक आहे.