दंतचिकित्सा

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमधील अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशा दंत चिकित्सा विभागाने मराठवाडा विभागात दंत चिकित्सेच्या क्षेत्रात क्रांती आणली आहे. दातांवरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना हा विभाग एक आल्हाददायक अनुभव प्रदान करतो. विभागातील तज्ञ व अनुभवी डॉक्टर व कर्मचारी वर्ग दातांवरील सर्व प्रकारचे उपचार देतात.

वैशिष्ट-

दंतरोग चिकित्सा विभाग अत्याधुनिक साहित्याने परिपूर्ण आहे. यात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या हाय एंड कॉन्फिडंट चामुंडी डेंटल चेअर युनिट, एक्स-रे युनिट, ईएमएस अल्ट्रासोनिक स्केलर, लाइट क्युअर युनिट आदींचा समावेश आहे.
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलच्या डेंटल सेंटरमध्ये प्रतिबंधात्मक दंतचिकित्सा हा एक प्रमुख विभाग आहे. आमच्या प्रतिबंधात्मक उपचार कार्यक्रमात दातांची काळजी घेण्यासाठीचे उपाय सुचविले जातात. यात हिरड्यांची सुधारणा आणि देखभाल, दातांच्या संवेदनशीलतेपासून आराम, फ्लोराईड उपचार आणि टूथ सीलंटची सुविधा मिळते. तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांचे लवकर पुनर्वसनही विभागात केले जाते.
दंत उपचार देण्याबरोबरच दंतचिकित्सा दातांची काळजी, उपचार यासंबंधी प्रबोधनाचे काम करतो. त्यासाठी दंत तपासणी शिबिरे, पोस्टर प्रदर्शने आणि प्रसार माध्यमातील लेखांद्वारे मौखिक आरोग्य जागरूकता केली जाते.

उपलब्ध सुविधा

  • एस्थेटिक डेंटिस्ट्री, स्मित हास्य सुधारणे, दात पांढरे करणे
  • जबड्याच्या विकृतीवर शस्त्रक्रिया आणि मॅक्झिलोफेशियल ट्रॉमा केअरचे व्यवस्थापन
  • ऑर्थोडोंटिक्स (अनियमित दात सुधारणे)
  • एंडोडोन्टिक्स (रूट कॅनल उपचार)
  • पीरियडॉन्टिक्स (हिरड्यांच्या आजारांवर उपचार)
  • कंझर्व्हेटिव्ह डेंटिस्ट्री वीथ मिनीमल इन्वेजन रिस्टोरेशन
  • तोंडी औषधांद्वारे दात आणि तोंडाशी संबंधित समस्यांवर उपचार
  • प्रोस्टोडोन्टिक्स (पडलेल्या दातांच्या जागी काढता येण्याजोगे किंवा स्थिर दात म्हणजे धातू, सिरॅमिक मुकुट आणि दंतरोपण)
  • पेडोडोन्टिक्स (चिमुकल्यांच्या दातांच्या काळजीसाठी ओपीडी. जनरल ऍनेस्थेसियाही उपलब्ध)

डॉ. हिमांशू गुप्ता

कन्सल्टन्ट डेंटल सर्जन आणि सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलचे मुख्य प्रशासक

BDS, HMP (ISB, हैदराबाद), MDP (IIM-A), PGDEMS, PGDMLS, PGDHHM
  •  सामान्य दंतचिकित्सा,
  •  प्रतिबंधात्मक दंतचिकित्सा,
  •  कॉस्मेटिक दंतचिकित्सा,
  •  इम्प्लांटोलॉजी

२५+ वर्षे

डॉ. सोनाली अंकुश खिल्लारे

कन्सल्टंट दंतचिकित्सा

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी

  • सामान्य दंतचिकित्सा,

१०+ वर्षे

डॉ. निधी सहानी

कन्सल्टंट दंतचिकित्सा

बीडीएस, एमडीएस (कंझर्वेटिव्ह डेंटिस्ट्री आणि एंडोडोन्टिक्स)

  • धूत हॉस्पिटल (दंत विभाग)

२०१९ मध्ये बंगळुरू येथे ६ महिने कन्सल्टन्ट

आपत्कालीन परिस्थिती

सेठ नंदला ल धूतरुग्णालयाच्या ओपीडीच्या निर्धारि त वेळेनंतर डॉक्टरांची आपत्काली न आवश्यकता असल्या स, आमच्या २४ ता स सुरू असणा ऱ्या हेल्हेपला ईनवर संपर्क सा धा - +91 0240- 2478400, 2478500, 2478600

डॉक्टरांना जाणून घ्या

सेठ नंदलाल धुत रुग्णालयातील डॉक्टर सामान्य आजारांबाबत प्रबोधन तसेच प्रतिबंध आणि उपचाराचा संदेशदे देण्यासाठी सातत्या ने परिश्रम घेत असतात.

मोबाईल क्रमांक

+91 240- 2478500
+91 240- 2478600
+91 789 789 9292

संपर्क साधा

connect@dhoothospital.com

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलशी संपर्क साधा

पत्ता

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल ए-१, ए-२, एमआयडीसी, चिकलठाणा, एअरपोर्ट रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००६ महाराष्ट्र, भारत.

फेसबुक

facebook.com/dhoothospital

ट्विटर

twitter.com/dhoothealthcare