क्रिटिकल केअर युनिट

रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये मराठवाडा विभागातील अत्याधुनिक असे मल्टी-स्पेशालिटी इंटेन्सिव्ह केअर युनिट उपलब्ध आहे. अतिव दक्षता विभागात पुढील रुग्णांवर उपचार केले जातात.

अतिव दक्षता विभागात पुढील रुग्णांवर उपचार केले जातात.

सीसीयूची ठळक वैशिष्ट्ये-

रुग्णालयात एकूण ४१ खाटांच्या सुविधेसह क्रिटिकल केअर युनिट एमआयसीयू, सीसीयू आणि सीव्हीटीएस उपलब्ध आहे. हे टेरेटरी रेफरल सेंटर व्हेंटिलेटर आणि मॉनिटरिंग उपकरणांसारख्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. येथील प्रशस्त व मोकळी जागा रुग्ण, कर्मचारी आणि अन्य सुविधांसाठी दिलासादायक आहे.

सीसीयूमध्ये अत्यंत उच्च दर्जाचे व्यवस्थापन, तज्ञ व कुशल डॉक्टर आणि अनुभवी कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. येथे रुग्णांची माहिती ठेवणारी केंद्रिय संगणीकृत मॉनिटरिंग सिस्टीम, नर्स आणि रुग्णांचे समप्रमाण, पोर्टेबल एक्स-रे सुविधा, इमर्जन्सी लॅब इन्व्हेस्टिगेशन, मॉड्युलर सिस्टिमद्वारे आर्टिरियल ब्लड गॅस मापन, कार्डियाक कॉटरायझेशन लॅब, मल्टी-स्लाइस सीटी स्कॅन, एमआरआय सुविधा तसेच तज्ज्ञ आणि पात्र इंटेन्सिव्हिस्ट २४ तास उपलब्ध आहे. येथील मनुष्यबळाला आरोग्य क्षेत्रातील नवीन माहिती मिळावी यासाठी सातत्याने प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते.

हेमोडायलिसिस युनिट-

आमच्याकडे अत्याधुनिक एचडी मशीनसह वातानुकूलित हेमोडायलिसिस युनिट उपलब्ध आहे. प्रत्येक बेडसाठी स्वतंत्र पल्स ऑक्सिमीटर आणि कार्डियाक मॉनिटर्सची सुविधा आहे. रुग्णांची सुविधा आणि काळजी लक्षात घेऊन तळ मजल्यावरील आयसीयू आणि नेफ्रोलॉजी ओपीडी विभागाशेजारी हा विभाग तयार करण्यात आला आहे. येथे दिवसातील २४ तास प्रशिक्षित आणि अनुभवी डायलिसिस तंत्रज्ञांची उपलब्धता असते.

आपत्कालीन परिस्थिती

सेठ नंदला ल धूतरुग्णालयाच्या ओपीडीच्या निर्धारि त वेळेनंतर डॉक्टरांची आपत्काली न आवश्यकता असल्या स, आमच्या २४ ता स सुरू असणा ऱ्या हेल्हेपला ईनवर संपर्क सा धा - +91 0240- 2478400, 2478500, 2478600

डॉक्टरांना जाणून घ्या

सेठ नंदलाल धुत रुग्णालयातील डॉक्टर सामान्य आजारांबाबत प्रबोधन तसेच प्रतिबंध आणि उपचाराचा संदेशदे देण्यासाठी सातत्या ने परिश्रम घेत असतात.

मोबाईल क्रमांक

+91 240- 2478500
+91 240- 2478600
+91 789 789 9292

संपर्क साधा

connect@dhoothospital.com

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलशी संपर्क साधा

पत्ता

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल ए-१, ए-२, एमआयडीसी, चिकलठाणा, एअरपोर्ट रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००६ महाराष्ट्र, भारत.

फेसबुक

facebook.com/dhoothospital

ट्विटर

twitter.com/dhoothealthcare