डोक्याला दुखापत होण्याच्या सर्वाधिक घटना भारतात घडतात. त्यामुळे या दुखापतीबाबत प्रबोधन आवश्यक आहे. डोक्याच्या एकूण दुखापतींपैकी ६०% दुखापती रस्ते अपघातांमुळे, तर अन्य ४०% पडणे, भांडणे आदी कारणांमुळे होतात.
देशात दर ६-७ मिनिटांनी डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू होतो. अमेरिकेत २५ पैकी १ व्यक्ती डोक्याला दुखापत झाल्यामुळे मृत्युमुखी पडतो. भारतात ६ पैकी १ व्यक्ती अशा दुखापतीमुळे जीव गमावतो. त्याचे कारण म्हणजे भारतात अशा दुखापतीच्या २-३ तासात घ्यावयाच्या काळजीची यंत्रणा म्हणजे पोस्ट ट्रॉमेटीक केअर उपलब्ध नाही. यामुळं डोक्याला झालेल्या दुखापतींविषयी जागरूकता वाढवणे क्रमप्राप्त ठरते, असे न्युरोसर्जन डॉ. आनंद डंक यांनी सांगितले.
Message continued in video.