दिवंगत श्री. नंदलाल माधवलाल धूत
संस्थापक, व्हिडिओकॉन उद्योग समूह
(२६ फेब्रुवारी १९३२ ते २६ एप्रिल १९९३)
अदभूत संकल्पना. दृढ निश्चय आणि
दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व
अनुभवी आणि तज्ञ कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने जागतिक मानकांवरील, उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा प्रदान करणे, त्यांच्या अनुभवातून वैद्यकीय आणि पॅरा क्लिनीकल क्षेत्रातील शैक्षणिक उद्दिष्ट्ये साध्य करणे. याच्या सोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार पद्धती विकसित करण्यासाठी संशोधनाला चालना देणे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य रुग्णांना किफायतशीर दरांमध्ये उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा प्रदान करणे. रुग्णसेवेचा सर्वाेत्तम दर्जा प्रस्थापित करणे समाजाच्या आरोग्य विषयक गरजांना सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी रुग्णालय कटिबद्ध आहे. आमचे रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी, सहकारी आणि समाजातील विविध घटकांशी परस्पर संवाद साधून आम्ही आमचे उद्दिष्ट साध्य करत आहोत.
.इतिहास
व्हिडिओकॉन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष पूज्य नंदलालजी धूत (काकासाहेब) यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतले. त्यांच्या सहृदयीपणाच्या भावनेमुळे ते समाजातील गरीब, शोषित आणि उपेक्षित वर्गाप्रती अत्यंत संवेदनशील झाले. हे रुग्णालय त्यांच्या प्रदीर्घ स्वप्नांची पूर्तता आहे.
निःस्वार्थ सेवेचा हाच वारसा पुढे नेत त्यांच्या मुलांनी वडिलांच्या नावाने सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून इथल्या मातीतील भूमिपूत्राच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्याचा हा प्रयत्न आहे. पुढील टप्प्यात १२ एप्रिल २००३ रोजी येथील कार्डियाक सेंटरचे उद्घाटन भारताचे उप पंतप्रधान माननीय श्री. लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते करण्यात आले. आज हे रुग्णालयाचा महाराष्ट्रातील आघाडीचे मल्टी-सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून नावलौकिक आहे.