हृदयरोग

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाचे हृदयरोग उपचार म्हणजेच कार्डियाक केअर युनिट उपलब्ध आहे. येथे २४ तास हृदयरोग तज्ञ, नॉन-इनवेसिव्ह कार्डियाक आणि इन्टेन्सिव्ह केअर युनिट आणि डीआरएम तंत्रज्ञानासह जीई-ऑप्टीमा २१०० ही सर्वात प्रगत फ्लॅट पॅनेल कॅथ-लॅब सुरू आहे.

कॅथ-लॅबची ठळक वैशिष्ट्ये-

कॅथ-लॅब अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बलून व्हॅल्व्ह्युलोप्लास्टी, एफ एफ आर, पेसमेकर इम्प्लांटेशन, इंट्रा-ऑर्टिक बलोन पंप इ. इंटर्वेंशनल कार्डियाक वरील उपचारासाठी जगातील सर्वाेत्तम उपकरणे आहेत. सेरेब्रल, रेनल आणि पेरिफेरल वेससाठी सर्वोत्तम निर्णय देणारे डिजिटल सब्सेट्रक्शन अँजिओ इमेजिंग (D.S.A.) उपलब्ध आहेत. यामुळे सेरेब्रल वाहिन्यांपासून ते डोर्सलिस पेडिस आणि पोस्टरियर टिबिअल पर्यंतच्या कोणत्याही रक्तवाहिन्यांची अँजिओग्राफीला स्पष्टता प्रदान होते. आमच्याकडे सेंट ज्युड येथून एफ एफ आर फ्रॅक्शनल फ्लोची सुविधा आहे. कोरोनरी वाहिन्यांमधील बॉर्डरलाइन ब्लॉक्सचे कार्यात्मक महत्त्व निर्धारित करण्यात ते उपयुक्त ठरते.
आमची कॅथ-लॅब प्रणाली रुग्णांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देत जलदगतीने परिणाम देते. विभागातील अनुभवी ऑपरेटर व कर्मचारी वर्ग किमान रेडिएशन डोस आणि स्पष्ट प्रतिमा उपलब्ध करून देण्यास प्रयत्न करतात. रुग्णांवर लक्ष ठेवणारे अत्याधुनिक मॉनिटरिंग तंत्रज्ञान, स्वतंत्र ६ खाटांची रिकव्हरी रूम आणि आणि ६ बेडेड कोरोनरी केअर युनिट (सीसीयू) या कॅथ-लॅबला परिपूर्ण करतात. आमचे केंद्र प्राथमिक तसेच क्लिष्ट कोरोनरी अँजिओप्लास्टी, डाव्या भागातील मुख्य अँजिओप्लास्टीसह स्टेंटिंग बायफरकेशन आणि स्टेंटिंगसह अँजिओप्लास्टीची सुविधा उपलब्ध करून देते. अशा उपचार पद्धतीचे निष्कर्ष अत्यंत समाधानकारक आणि आंतरराष्ट्रीय मानकांच्या बरोबरीचे आहेत. आम्ही मे २०१५ पर्यंत सुमारे २१,००० कॅथ लॅब प्रक्रिया केल्या आहेत. तसेच डॉ. समीन शर्मा (यूएसए) आणि डॉ. इमाद शीबान (इटली) यांच्यासारख्या अनुभवी आंतरराष्ट्रीय ऑपरेटर्सच्या सहकार्याने कॉम्प्लेक्स इंटरव्हेशनल कॉर्डिओलॉजी कार्यशाळांचे आयोजन केले आहे.

नॉन-इनवेसिव्ह कार्डिओलॉजी युनिट-

या विभागात टूडी इको कलर डॉपलर (जीई-विविड-६), स्ट्रेस टेस्ट (जीई हाय व्हर्जन), होल्टर मॉनिटरिंग सिस्टीम, २४ तास सुरू असणारे एम्ब्युलेटरी बीपी मॉनिटरिंग आणि हृदयरोगाशी संबंधित विविध आरोग्य तपासणीचे पॅकेजेस आहेत. आमच्या अल्ट्रा-मॉडर्न कोरोनरी केअर युनिटमध्ये अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.

कार्डिओ व्हॅस्क्युलर आणि कार्डिओ थोरॅसिक युनिट

आमच्याकडे पुढील सुविधा असणाऱ्या सुसज्ज दोन कार्डियाक ऑपरेशन थिएटर्स आहेत.
विभागाने गेल्या ५ वर्षांत १८०० हून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. आमच्याकडे प्रौढ रुग्णांवर केल्या जाणाऱ्या बायपास सर्जरी (सीएबीजी) दररोज बीटिंग हार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जातात. त्याचप्रमाणे सिंगल, डबल आणि ट्रिपल व्हॉल्व्हची दुरुस्ती आणि बदली, बेंटॉल प्रक्रिया, एलए मायक्सोमा दुरुस्ती, आरएसओव्ही दुरुस्ती, प्रौढ टीओएफ इत्यादी उपचार केले जातात. सर्व शस्त्रक्रियांमध्ये इंट्राऑपरेटिव्ह ट्रान्स एसोफेजल इकोकार्डियोग्राफी केल्यामुळे त्यांचे डॉक्युमेंटेशन सहज शक्य होते. या विभागात बालकांवरील अत्यंत क्लिष्ट अशा जन्मजात हृदयरोगावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यास चांगले यश मिळाले आहे. तर नियमितपणे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया व्यतिरिक्त आम्ही एएसडी, व्हीएसडी, पीडीए, बीटी शंट आणि टीओएफ दुरुस्तीचे उपचारही केले जातात. तर आजवर ग्लेन शंट, फॉन्टन्स रिपेअर, एलए एन्युरिझम रिपेअर, पेडियाट्रिक व्हॉल्व्ह रिपेअर तसेच डेक्स्ट्रोकार्डिया रुग्णावरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. कार्डियाक व्यतिरिक्त, थोरॅसिक आणि महाधमनी रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया देखील केल्या जातात.

डॉ. रोहित वळसे

वरिष्ठ सल्लागार आणि एचओडी - हृदयरोग विभाग.

डीएम (कार्डिओलॉजी), एमडी (मेड), एफएससीसी-एफएससीएआय (यूएसए),         एफईएससी (युरोप), एफसीएसआय (इंडिया)
  • क्लिष्ट ह्रदयरोग उपचार,
  •  रेडियल मार्गातील तज्ञ,
  •  नॉन-कोरोनरी इंटरव्हेनशन,
  •  2D Echo Colour Doppler
  • Stress Test,
  • Holter Monitoring
  • Ambulatory Blood Pressure,
  • Monitoring,
  • Clinical Cardiology
  • Excellent Orator and faculty in various National and International Conference.
  • Author of multiple publications & chapters in the text books.

२५+ वर्षे

डॉ. प्रवीर लाठी

सल्लागार आणि आंतरराष्ट्रीय हृदयरोग तज्ञ.

एमडी, डीएनबी(कार्डिओलॉजी), FSCAI (USA), FESC.
  • क्लिष्ट ह्रदयरोग उपचार,
  •  रेडियल मार्गातील तज्ञ,
  •  नॉन-कोरोनरी इंटरव्हेनशन,
  •  2D Echo Colour Doppler
  • Stress Test,
  • Holter Monitoring
  • Ambulatory Blood Pressure,
  • Monitoring,
  • Clinical Cardiology

२० वर्षे

डॉ. देवेंद्र बोरगांवकर

सल्लागार आणि आंतरराष्ट्रीय हृदयरोग तज्ञ.

MBBS, MD Medicine, DM Cardiology, FSCAI(USA)

  • Diagnosis And Management Of Coronary Artery Disease,
  • Heart failure
  • Valvular Heart Disease
  • Pulmonary Hypertension
  • Adult & Congenital Heart Diseases etc.
  • Echo-Cardiography (2D
  • Contrast ECHO,
  • Dobutamine Stress ECHO
  • Transesophageal ECHO)
  • कोरोनरी अँजिओग्राफी
  • कोरोनरी अँजिओप्लास्टी
  • इंट्राव्हस्कुलर लिथोट्रिप्सी
  • अल्कोहोल सेप्टल ऍब्लेशन
  • ह्रदयविकाराचा धक्का
  • Cardiac Catheterization study
  • रोटेबलेशन
  • Coronary Imaging – IVUS, OCT
  • Device closures – ASD, VSD, PDA, RSOV, PFO

१०+ वर्षे

डॉ. रोहित वळसे

कन्सलटंट हृदयरोगतज्ज्ञ

एमबीबीएस (केईएम, मुंबई), एमडी मेडिसिन (जीएमसी, छत्रपती संभाजीनगर), डीएम कार्डिओलॉजी (एससीटीआयएमएसटी, केरळ), पीडीएफ इन इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी (एससीटीआयएमएसटी, केरळ), कार्डिओलॉजीमधील उत्कृष्टतेसाठी एव्ही गांधी एससीएआय पुरस्कार प्राप्तकर्ता

  • इको-कार्डियोग्राफी (2D, कॉन्ट्रास्ट इको, डोबुटामाइन स्ट्रेस इको, ट्रान्ससोफेजल इको)
  • कोरोनरी अँजिओग्राफी
  • कार्डियाक कॅथेटेरायझेशन स्टडी
  • कोरोनरी अँजिओप्लास्टी
  • रोटेबलेशन
  • इंट्राव्हस्कुलर लिथोट्रिप्सी
  • कोरोनरी इमेजिंग- IVUS, OCT
  • अल्कोहोल सेप्टल ऍब्लेशन
  • डिव्हाइस बंद करणे- ASD, VSD, PDA, RSOV, PFO
  • ह्रदयविकाराचा धक्का

5 वर्षे

डॉ. मुनीर अहमद वळसंगकर

सहयोगी हृदयरोगतज्ज्ञ

MBBS, MD Cardiology.

१३ वर्षे

आपत्कालीन परिस्थिती

सेठ नंदला ल धूतरुग्णालयाच्या ओपीडीच्या निर्धारि त वेळेनंतर डॉक्टरांची आपत्काली न आवश्यकता असल्या स, आमच्या २४ ता स सुरू असणा ऱ्या हेल्हेपला ईनवर संपर्क सा धा - +91 0240- 2478400, 2478500, 2478600

डॉक्टरांना जाणून घ्या

सेठ नंदलाल धुत रुग्णालयातील डॉक्टर सामान्य आजारांबाबत प्रबोधन तसेच प्रतिबंध आणि उपचाराचा संदेशदे देण्यासाठी सातत्या ने परिश्रम घेत असतात.

मोबाईल क्रमांक

+91 240- 2478500
+91 240- 2478600
+91 789 789 9292

संपर्क साधा

connect@dhoothospital.com

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलशी संपर्क साधा

पत्ता

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल ए-१, ए-२, एमआयडीसी, चिकलठाणा, एअरपोर्ट रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१००६ महाराष्ट्र, भारत.

फेसबुक

facebook.com/dhoothospital

ट्विटर

twitter.com/dhoothealthcare