मार्च २०२० पासून सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल औरंगाबाद समर्पित कोविड हॉस्पिटल आहे.
डॉ. वरुण गवळी, डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. संदीप बावकर, डॉ. तुषार तनपुरे, बालरोग चिकित्सा तज्ञ डॉ. रेणू बोराळकर यांच्यासह नर्सिंग केअर आणि पॅरामेडिकल स्टाफच्या टीमने १५ जुलै २०२० पर्यंत कोविडच्या ४०० हून अधिक पॉझिटिव्ह रुग्णांना तर ७५० हून धअिक संशयित रुग्णांवर उपचार केले.
कोविड महामारीच्या काळात राज्य राखीव पोलीस दल, आरोग्य सेवेतील कर्मचारी, आरोग्य सेवेतील व्यावसायिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर उपचार केल्याबद्दल या पथकाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.